Uncategorized

महावितरणच्या विरोधात आरती देवमाने यांचे रस्ता रोको आंदोलन….

विविध मागण्यासाठी करणार करमाळा – जामखेड रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन

जामखेड वृतसेवा –
वादळी पावसाने जवळा परिसरात पडलेले विजेचे खांब तात्काळ उभे करून वीज पुरवठा सुरुळीत करावा यासह विविध मागण्यासाठी १३ जून गुरुवार रोजी सकाळी १० वाजता आरती देवमाने यांचे जवळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक [ जवळा फाटा ] समता नगर जामखेड – करमाळा रस्त्यावर शेतकऱ्यांसह रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन प्रभारी अधिकारी राजुळे उपकार्यकारी अभियंता महावितरण जामखेड उपविभाग जामखेड यांना देण्यात आले असल्याची माहिती आरती देवमाने यांनी दिली आहे.

निवेदनात म्हंटले कि, जवळा येथील ३३/११ केव्ही अंतर्गत पावसाळापूर्वीचे दुरुस्ती तात्काळ करावी , जवळा ३३/११ केव्ही अंतर्गत सुरु असलेला वीजपुरवठा सतत नादुरुस्त असल्याने शेतकऱ्यांचे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. तसेच मागील तीन आठवड्यापासून वादळी पावसाने विजेचे खांब पडले आहेत ते तात्काळ दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत करावा. तसेच नान्नज विभागांतर्गत कायमस्वरूपी सहायक अभियंता यांची नियुक्ती करावी. जुनी आष्टी वीज वाहिनी सुरु करावी, यासह विविध मागण्यासाठी १३ जून रोजी सकाळी १० वाजता जवळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक [ जवळा फाटा ] समता नगर येथे शेतकऱ्यासह रस्ता रोको आंदोलन करणार आहेत. तसेच याबाबत जामखेड चे तहसीलदार गणेश माळी , पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, आरती देवमाने, सचिन आटकरे, ज्ञानेश्वर दळवी, वैभव खोले आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांसोबत रस्ता रोको आंदोलन – आरती देवमाने
जवळा ३३ / ११ केव्ही अंतर्गत गेल्या २० ते २५ दिवसापासून जवळा परिसरातील शेतकऱ्यांच्या वादळी पावसामुळे विजेचे खांब मोठ्याप्रमाणात पडले आहेत. ते विजेचे खांब उभे करून वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सातत्याने महावितरणच्या अधिकारी यांच्या शी चर्चा करत होतोत पण गेल्या २० ते २५ दिवसापासून विजेचे खांब तसेच पडून आहेत, महावितरणच्या हलगर्जीपणा मुळे अनेक शेतकऱ्यांना जनावरांसाठी डोक्यावर पाणी घेऊन जावे लागत आहे. इतकी गंभीर परिस्थिती असताना देखील महावितरणचे अधिकारी यांनी काहीच हालचाल केली नाही, म्हणून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शेतकऱ्यांसोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्या आरती देवमाने यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!