Uncategorizedलोकल न्यूज़

मराठी पत्रकार संघाच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी ओंकार दळवी ,उपाध्यक्षपदी समीर शेख

लोकतंत्र न्यूज नेटवर्क –
(प्रतीनीधी विजय राजकर ) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जामखेड तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून जिल्हाउपाध्यक्षपदी लियाकत शेख,जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी प्रकाश खंडागळे,दीपक देवमाने तर जामखेड तालुकाध्यक्षपदी दैनिक प्रभातचे ओंकार दळवी ,उपाध्यक्षपदी समीर शेख,सचिव पदी संदेश हजारे कार्याध्यक्षपदी सचिन आटकरे तर खजिनदारपदी रामहरी रोडे याच्या नियुक्ती करण्यात आल्या असून निवडीचे पत्र संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी ,जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाचपुते यांच्या हस्ते देण्यात आले

पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे राज्य सचिव सीताराम लांडगे यांच्या सुचनेनुसार काष्टी ता श्रीगोंदा येथील सेवा सोसायटीच्या सभागृहात प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती,

जिल्हाउपाध्यक्षपदी लियाकत शेख,

जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी प्रकाश खंडागळे,दीपक देवमाने

जामखेड तालुकाध्यक्षपदी दैनिक प्रभातचे ओंकार दळवी ,

उपाध्यक्षपदी समीर शेख,

सचिव पदी संदेश हजारे

कार्याध्यक्षपदी सचिन आटकरे

तर खजिनदारपदी रामहरी रोडे

यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

पारनेर,कर्जत,जामखेड,शेवगाव,पाथर्डी,श्रीगोंदा येथील जवळपास २०० पत्रकार बैठकीला उपस्थित होते यावेळी सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय पाचपुते यांची निवड जाहीर करून विविध तालुक्यातील निवडी जाहीर करण्यात आल्या यावेळी जामखेड तालुकाध्यक्षपदी दैनिक प्रभातचे ओंकार दळवी ,उपाध्यक्षपदी समीर शेख,सचिव पदी संदेश हजारे कार्याध्यक्षपदी सचिन आटकरे तर खजिनदारपदी रामहरी रोडे यांच्या निवडी करण्यात आल्या असुन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष किरण जोशी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाचपुते यांनी दिले आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष किरण जोशी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ह्या वेगवेगळ्या संघटना असून, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांची कोणती ही शाखा नाही. त्यामुळे आज मी स्वतः येथे उपस्थित राहुन जिल्ह्याच्या पदाथिकार्यांच्या अधिकृत निवडी जाहिर करत आहे. . संघटनेसाठी आणि पत्रकाराच्या हितासाठी आपण एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. पत्रकारीते सोबत समाजहिताच्या कार्यातही आपण सर्वांनीच एकाजिवाने कामे कराल अशी आशा आहे.लवकरच पुणे येथे पत्रकार संघाचे अधिवेशन होणार असल्याचे सांगितले यावेळी नूतन अध्यक्ष ओंकार दळवी यांनी पत्रकारांचे प्रश्न आणि विविध योजनांबाबत प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले यावेळी जेष्ठ पत्रकार शिवाजी इकडे,वसंतराव सानप,शंकर कुचेकर विजय राजकार यांच्यसह पत्रकार उपथित होते या निवडीबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ,खासदार निलेश लंके,माजी खासदार डॉ सुजय विखे,आमदार रोहित पवार आमदार राम शिंदे आदीनी अभिनंदन केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!