Uncategorizedराजकीय

आ.रोहित पवार यांच्या एकाधिकार शाहीला कंटाळून प्रा. मधुकर राळेभात यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम

पुढील भूमिका कार्यकर्त्यांना विचारून लवकरच.......

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे व आ. रोहित पवार यांचे खंदे समर्थक, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला राम राम ठोकला आहे. याबाबत त्यांनी आज रविवार दि 25 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत घेऊन आपली भुमिका स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी आ. रोहित पवार यांचेवर अनेक गंभीर आरोप केले. यावेळी नगरसेवक मोहन पवार, अमित जाधव, महालिंग कोरे राष्ट्रवादी खर्डा शहराध्यक्ष, राजेंद्र वारे रत्नापूर उपस्थित होते.

मागील विधानसभा निवडणुकीत आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रेरणेने आम्ही सहभागी झालो व स्थानिक कॅबिनेट मंत्र्याला पराभूत करून रोहित पवार यांना आमदार म्हणून निवडून आणले. पण गेल्या साडेचार वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष न ठेवता बारामती अँग्रो लिमिटेड कामगारासारखी अवस्था केली.आहे. त्यामुळे त्यांच्या एकाधिकार शाहीला कंटाळून  आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत असून पुढील भूमिका कार्यकर्त्यांना विचारून लवकरच ठरवू .

                                                                               —प्रा. मधुकर राळेभात

यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, सदर मतदार संघात जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर प्रदेशाध्यक्ष,,जिल्हाध्यक्ष, तालुका, तालुकाध्यक्ष या पदाधिकाऱ्यांचे नाव किंवा फोटो न लावता स्वतःचे नाव आईचे नाव व फोटो महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना नाव न वापरता आमदार रोहित पवार आयोजित कार्यक्रम केले जातात.जामखेड येथिल सायकल वाटप कार्यक्रमात 1700 विद्यार्थ्यांना सायकल वाटून जास्त जाहिर केल्या. सातत्याने असेच सोशल मिडीया प्रिंट, इलेक्ट्रोनिक मिडीयात खोटे वक्तव्य करतात त्यामुळे कुंचबना होते.

राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठी संधी –

जामखेडच्या राजकारणाचा मुख्य कणा म्हणून ओळख असणारे मधुकर आबा राळेभात यांनी शरद पवार गटाला रामराम ठोकल्यामुळे रोहित पवार याना कोंडीत पकडण्यासाठी अजित पवार गटाला आयती संधी मिळाली असून जर राळेभात हे त्यांचा गळाला लागले तर अजित पवार गटाची तालुक्यातील पकड आणखी मजबूत होईल.

तालुक्यातील मूलभूत गरजांचा विकास न करता शाशकीय इमारती बांधून मोठा विकास केल्याचा बोलबाला केला जातो. मतदार संघात विकास झाला नाही. अधिकात्यांची मनधरनी केली जाते. आजही तालुक्यामध्ये विज, पाणी, रस्ते हे ज्वलंत प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष करून अधिकायांना बसण्या उठण्यासाठी करोडो रुपये खर्च केला. त्याने रोजगाराचा व मुलभूत गरजांचा प्रश्न सुटत नाही.मतदारसंघातील एकही कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक न देता बारामती अॅग्रोच्या कामगारासारखी वागणूक देण्यात आली. या मतदारसंघात गेले 25 ते 30 वर्षापासून ज्या कार्यकर्त्यांने अहोरात्र पक्षासाठी काम केले. त्यांचाही सन्मान राखला जात नाही.बरेचसे कार्यकर्ते त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असून त्यांचाही सतत अपमानीत केले जाते. बर्याच कार्यकत्यांना दम देवून भयभित केले जाते. किंवा विरोध करणाऱ्या कार्यकत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. हे कुठले राजकारण… (हुकूमशाही) राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यक्रमात जेष्ठ कार्यकर्त्याना मत मांडण्याच अधिकार दिला जात नाही. मतदारसंघात एखादा कार्यक्रम किंवा उद्घाटनासाठी आमदार उपस्थित नसेल तर स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीच्या हस्ते कार्यक्रम केला जातो पण कार्यकर्त्यांना संधी दिली जात नाहि.या सर्व गोष्टींना कंटाळून आम्ही आमच्या सर्व पदाचा राजीनामा देवून राष्ट्रवादी
शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षातून बाहेर पडत आहोत.अशी भूमिका घेतली आहे पुढील पंधरा दिवसात काय भूमिका घेतात याकडे जामखेड करांचे लक्ष लागले आहे.

२०२४ ची विधानसभा निवडणूक स्थानिक विरुद्ध बाहेरचा अशीच होईल.

 

रोहित पवार यांच्या विरोधात स्थानिक सर्व नेते एकत्र राहणार आहेत.

 

पैसे वाटून व साहित्य वाटून आमदार होता येत नाही हे पवारांनी लक्षात ठेवावे.

                                                           —प्रा. मधुकर राळेभात

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!