लोकल न्यूज़
कारगिल विजय दिनानिमित्त “शहिदांसाठी एक झाड” उपक्रम नागेश विद्यालय संपन्न.

लोकतंत्र न्यूज नेटवर्क (प्रतिनीधी विजय राजकर) – रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयातील एनसीसी छात्रांनी शहिदांसाठी एक झाड लावून कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना मानवंदना दिली अशी माहिती प्राचार्य मडके बी के यांनी दिली.
कारगिल विजय दिनानिमित्त श्री नागेश विद्यालय मध्ये शहिदांच्या स्मरणार्थ वृक्ष लागवड करण्यात आले. सतरा महाराष्ट्र बटालियन चे नागेश विद्यालयचे युनिटने यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. पंचवीसवा कारगिल दिनानिमित्त विद्यालयामध्ये 25 विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले. या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी एनसीसी कॅडेट घेतली.



