लोकल न्यूज़
जामखेड शहरात श्री स्वामी समर्थ केंद्रामार्फत २ डिसेंबरला सत्संग सोहळा
चंद्रकांत दादा मोरे करणार मार्गदर्शन

लोकतंत्र न्यूज नेटवर्क –
(विजय राजकर)
अखिल भारतीय स्वामी समर्थ अष्टसिद्ध महाशक्तीपीठ त्रंबकेश्वर येथील प्रशासकीय प्रमुख व परमपूज्य गुरुमाऊली यांचे सुपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांचे सोमवार दि ०२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अमृततुल्य हितगुज या सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जामखेड येथील श्री स्वामी समर्थ केंद्रासाचे सेवेकरी यांच्यामार्फत करण्यात आले आहे
जामखेड येथील जामखेड महाविदयालय येथे भव्य दिव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून क्रांतीदूत गुरूपुत्र आदरणीय चंद्रकांत मोरे यांचा भव्य सत्संग मेळावा व अमृततुल्य मार्गदर्शन सोहळा होणार आहे
या सत्संग कार्यक्रमात ते मानवी जीवनाशी संबंधित शेतीशास्त्र, आयुर्वेद, विवाह संस्कार, मराठी अस्मिता भारतीय संस्कृती, प्रश्नोत्तर, बालसंस्कार स्वयंरोजगार अशा महत्वपूर्ण विषयांवर प्रकाश टाकणार आहेत.




