हाळगावच्या कृषिकन्यांचे परीटवाडीमध्ये स्वागत…

खर्डा प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी च्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविदयालयाच्या चतुर्थ वर्षांच्या विद्यार्थिनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औदयोगिक कार्यानुभव उपक्रमा अंतर्गत परीटवाडी गावात दाखल झाल्या आहेत यामध्ये कु. श्रावणी दसगुडे, कु. सुवर्णा आवळे कु. वंदना बहिर कु. पुजा बांगर, कु. पुजा चेके, कु. अंजली चौधरी यांचा समावेश आहे.सरपंच श्री. विलास काळे ग्रामपंचायत सदस्य श्री. बापुराव काळे संपर्क शेतकरी नामदेव क्षीरसागर व इतर शेतकऱ्यांनी कृषी कन्यांचे स्वागत केले.
कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विदयार्थ्यांसाठी हा प्रात्यक्षिकावर आधारित उपक्रम राबविला जातो . या कार्यक्रमाअंतर्गत २४ आठवडे त्या विविध प्रकारच्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, शेतकऱ्यांचे जीवनमान त्यांचा सामाजिक- आर्थिक बाबींसंबंधित गावातील पीक पद्धती अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. गावातील शेती पद्धती नैसर्गिक संसाधने व त्यांचा वापर, गावातील पशूंची संख्या व त्यांचे नियोजन, पाणी व्यवस्थापन ” पिकांवरील कीड ,रोगांचे व्यवस्थापन शेतीमालाचा बाजारभाव व आधुनिक तंत्रज्ञान यांचाही आढावा घेतला जाईल. या कार्यक्रमात महाविदयालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे , कार्यक्रम समन्वयक डॉ. सखेचंद अनारसे, केंद्रप्रमुख डॉ. प्रेरणा भोसले , अधिष्ठाता प्रतिनिधि डॉ. अरुण पाळंदे,कार्यक्रम अधिकारी डॉ. निकिता धाडगे व इतर विषय व विषयेतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.



