लोकल न्यूज़
महावितरण कार्यालयातील मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात दत्त जन्मोत्सव साजरा.

आज जामखेड शहरात विविध ठिकाणी दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तसेच सालाबादप्रमाणे याही वर्षी जामखेड महावितरण कार्यालयातील मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दत्त जयंतीच्या निमित्ताने मंदिरात धार्मिक विधी श्री.कटकधोंड साहेब यांच्या हस्ते सपत्नीक विधीवत महा अभिषेक पूजा करण्यात आली. यावेळी येथे दत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविक मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आले होते. दत्त जयंतीच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक रोषणाई आणि फुलांनी सजवट करण्यात आली होती.
महावितरण कार्यालयातील दत्त मंदिरामध्ये 48 वा दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्या निनित्ताने 201 किलो चा महाप्रसाद भाविकांसाठी तयार करण्यात आला होता. जामखेड महावितरण कर्मचारी यांच्या वतीने सर्व दत्त भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सालाबाद प्रमाणे शशिकांत राऊत,वरद सुपर मार्केट,वैभव किराणा स्टोअर ,किसन पेचे ,बबलू पवार,राजू फिटर ,सुरेश पवार,फुटाणे यांनी अन्नदान केले.

सदर दत्त मंदिर ची स्थापना सन.1976 साली त्या वेळेस चे स.अभियंता श्री.पांडे साहेब यांच्या प्रेरणेतून श्री.दत्त मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करण्यात आली होती. ते आजही दत्त जयंती उत्सवा करिता नियमित वार्षिक वर्गणी देतात.




