धर्म
आज खर्डा विजयाला २३० वर्ष पुर्ण…शुरवीरांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खर्डा ता जामखेड यांच्यावतीने मानवंदना
११मार्च १७९५ खर्डा लढाई...

लोकतंत्र न्यूज नेटवर्क-
आज विजय दिन मराठाशौर्यदिनानिमित्ताने शुरवीरांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खर्डा ता जामखेड यांच्यावतीने मानवंदना देउन शिवछत्रपतींच्या मुर्तीचे पुजन करुन जयघोष करण्यात आला.
यावेळी किल्ल्यावर भगवा ध्वज लावण्यात आला. आज खर्ड्याच्या लढाईला २३० वर्ष पुर्ण झाली. खर्डा येथील लढाई ला येथूनच १५ किलो मीटर अंतरावर दौंडवाडी आहे. येथल रणटेकडीवरदेखील भगवा ध्वज लावुन जयघोष करुन मान वंदना देण्यात आली.
या दोन्ही ऐतिहासिक स्थळांचा उत्कृष्ट पध्दतीने विकास व्हावा आणि हा वारसा पिढ्यानपिढ्या जतन व्हावा हिच अपेक्षा शिवप्रेमींनी तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका यांचेवतीने करण्यात आली वेळोवेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुक्याच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येते.तसेच किल्यावर तोफही बसवण्यातआली असुन किल्ल्यात सापडलेले तोफ~ गोळे व्यवस्थित रहावे म्हणून लोखंडी गेट बसवून तोफगोळे सुरक्षित ठेवण्यात आले.
पुरातत्व विभागाकडून खर्डा किल्ल्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष किल्ल्याच्या गेट वर पुरातत्व विभागाकडून अजुनही शिपाई ठेवण्यात आलेला नाही. वेळोवेळी मागणी करुनही दुर्लक्ष केले जात आहे.




