Uncategorizedधर्म
छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्ताने “छावा” चित्रपटाचे आयोजन
श्री. शिवराज्याभिषेक उत्सव समिती व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका यांचा उपक्रम

लोकतंत्र न्यूज नेटवर्क – हिंदवी स्वराज्याचे दुसरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्ताने वतीने देशभर गाजत असलेला “छावा” चित्रपट मोफत पाहण्यासाठी जामखेड येथील श्री. शिवराज्याभिषेक उत्सव समिती व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका यांच्या वतीने आज शनिवार दि. २९-३-२०२५ रोजी मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली असून महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत व जाज्वल्य इतिहास माहिती करून घेण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा- पांडुरंग भोसले, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका


