Uncategorizedलोकल न्यूज़
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळांना प्रथमोपचार पेटी व मुलांना खाऊ व फळांचे वाटप
संजय काका काशीद यांचा स्तुत्य उपक्रम

लोकतंत्र न्यूज नेटवर्क-
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांच्या वतीने शहरातील सुमारे वीस जिल्हा परिषद शाळांना प्रथमोपचार पेटी व मुलांना खाऊ व फळांचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळांना प्रथमोपचार पेटी ची खुपच आवश्यकता होती. चिमुकले मुले खेळताना पडली किंवा इतर लहानसहान अपघाताच्या वेळी एखादी जखम होते त्यावेळी प्रथमोपचार पेटी ची गरज भासते हीच अडचण ओळखून संजय काका काशीद यांनी अशावेळी तात्काळ प्राथमिक उपचार करता यावेत म्हणून प्रथमोपचार पेटी देण्याचे ठरवले.
जामखेड शहरातील महादेव गल्ली, उर्दू मुले व मुली शाळा, एकलव्य शाळा, तपनेश्वर गल्ली, पोकळे वस्ती, मराठी मुले, मराठी मुली, श्रमजीवी, जमादारवाडी, नेटकेवस्ती, आजबे वस्ती, चुंभळी, बटेवाडी, जगदाळे वस्ती, लेहनेवाडी, जाबवाडी, भूतवडा, पांडववस्ती, धोत्री, अहिल्यादेवीनगर अशा जिल्हा परिषद शाळांना प्रथमोपचार पेटी व विद्यार्थ्यांना खाऊ व फळे वाटप करण्यात आले
तसेच लहान मुलांना खाऊचे विशेष आकर्षण असते व आपल्या नेत्याचा वाढदिवस हा सर्वांसाठी आनंददायी ठरावा म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ तसेच फळे वाटप केले.
संजय काशिद यांचा वीस ऐंशी फोर्मुला
मंडलाध्यक्ष संजय काशिद हे वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण करतात सभापती प्रा राम शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.
आपल्या जगदंब प्रतिष्ठान मार्फत विविध सामाजिक उपक्रम ते दरवर्षी राबवितात. हळदी कुंकू कार्यक्रम, विधवा महिलांचा सन्मान करणे, दुर्गा वाहन रैली (महिला), रक्तदान शिबीर, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, महिला आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा, गड किल्ले स्वच्छता मोहीम, वढू बुद्रुक येथे दीपोत्सव, मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी मर्दानी खेळांचे शिबीरे, असे विविध कार्यक्रम सतत सुरू असतात.




