लोकल न्यूज़
सैनिकांप्रमाणे आपणही देश सेवा करावी- पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी.
कारगिल विजय दिनानिमित्त राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने मानवंदना.

लोकतंत्र न्यूज नेटवर्क-
26 जुलै कारगिल विजय दिवस संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो राष्ट्रीय छात्र सेना १७ महाराष्ट्र बटालियन अहिल्यानगर जामखेड मध्ये एनसीसीच्या वतीने कारगिल विजय दिवस अतिशय मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते शहिदांना पुष्पचक्र वाहून मानवंदना देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी , प्राचार्य सुनील पुराणे , प्राचार्य पारखे बी ए, प्राचार्य मडके बी के, उप प्राचार्य सुनील नारके, कॅप्टन गौतम केळकर, सेकंड ऑफिसर अनिल देडे, सेकंड ऑफिसर मयूर भोसले,प्रा अविनाश फलके,प्रा आण्णा मोहिते, पोलीस हवालदार हनुमंत अडसूळ, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव व शिक्षक एनसीसी कॅडेट उपस्थित होते.
प्राचार्य सुनील पुराणे , प्राचार्य पारखे बी ए, प्राचार्य मडके बी के यांनी कारगिल दिनाचे महत्त्व सांगितले.
जामखेड महाविद्यालय,ल ना होशिंग विद्यालय व रयतचे श्री नागेश विद्यालय जामखेड एनसीसी युनिटच्या वतीने कारगिल शहीद जवान स्मारकास मानवंदना देण्यात आले.
प्रास्ताविक गौतम केळकर ,सूत्रसंचालन अनिल देडे, आभार प्रदर्शन मयूर भोसले यांनी केले.
भारतीय सैनिकांनी जीवाची परवा न करता कारगिल युद्ध जिंकले आपली नोकरी व सैनिकाची नोकरी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे .सैनिक सर्व परिवार सोडून आपल्यासाठी रात्रंदिवस सीमेवर लढत आहेत त्यांचे या वीरमरणामुळे कारगिल विजय दिवस प्राप्त झाला. या दिनाचे स्मरण झालेच पाहिजे. हा उपक्रम आयोजित केल्याने विद्यार्थी व सर्वांमध्ये देशप्रेम निर्माण होते. सैनिकांप्रमाणे आपणही देश सेवा करावी व भारतीय सेनेमध्ये दाखल व्हावे -पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी




