लोकल न्यूज़
तिरंगा पदयात्रेत सहभागी व्हा – संजय काशिद
जामखेड भाजपा व मित्रपक्षाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ चे आयोजन

जामखेड : देशभरात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे आणि राज्यापासून गावपातळीपर्यंत तिरंगामय उत्साह पसरावा, या उद्देशाने राज्यात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर जामखेड मधील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांनी केले.

या मोहिमेअंतर्गत जामखेड तालुक्यात प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासाठी भाजपाच्या वतीने जोरदार जनजागृती मोहीम राबवली जात आहे. शहर व ग्रामीण भागात प्रचारफेरी, आणि जनसंपर्कातून नागरिकांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जात आहे.
या उपक्रमात गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता शासकीय विश्रामगृहातून भव्य तिरंगा बाईक रॅली निघणार आहे. रॅली नगर रोड – खर्डा कॉर्नर – तपनेश्वर रोड – धर्मयोद्धा चौक – मिलिंद नगर – बीड रोड – जय हिंद चौक – छत्रपती शिवाजी महाराज मेन पेठ – लक्ष्मी चौक (संविधान स्तंभ) – खर्डा चौक मार्गे पार पडून तेथे समारोप होईल.



