लोकल न्यूज़
प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न
नगरसेविका राजश्री ताई पवार व युवा नेते मोहन (वस्ताद) पवार यांचा पुढाकार

लोकतंत्र न्यूज नेटवर्क – जेष्ठ भाजपा नेते प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका राजश्री पवार व मोहन पवार यांनी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित केले होते यामध्ये रूग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे निमित्ताने काल दि. ११ ऑगस्ट पासून कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने आज बुधवार दि. १३ ऑगस्ट रोजी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ९ च्या नगरसेविका राजश्रीताई पवार व युवा नेते मोहन (वस्ताद) पवार यांच्या पुढाकारातून जामखेड शहरातील तपनेश्वर भागात मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
राजश्रीताई पवार व मोहन पवार या दांपत्याने गेल्या पाच वर्षांत प्रभाग नऊ मधे विकासकामांसह हळदी-कुंकू समारंभ, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम राबवून सामाजिकबांधिलकी जपली आहे.




