लोकल न्यूज़
कार्तिकी वारीसाठी जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे झाले प्रस्थान..

लोकतंत्र न्यूज नेटवर्क-
वै. बाबामहाराज सातारकर व ह.भ.प प्रकाश महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीपशेठ बाफना व परिवाराच्या वतीने कार्तिकी एकादशीला जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे गेली तीस वर्षे हा नेत्रदीपक दिंडी सोहळा पार पडत आहे
जामखेड शहरातील विठ्ठल भजनी मंडळ व पंचक्रोशीतील महाराज मंडळी गुणीजन गायक वादक व टाळकरी भाविक भक्त या दिडींत सहभागी होत आसतात
आज रोजी सकाळी विठ्ठल मंदिर येथे आकाश बाफना व पायलताई बाफना यांच्या हस्ते विना पुजन करुन दिंडीचे प्रस्थान झाले टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी छत्रपती शिवाजी महाराज पेठेतुन दिलीप मशनरी समोर दिंडीचे स्वागत करण्यात आले
यावेळी बोलताना दिंडीचे मुख्य प्रवर्तक दिलीपशेठ बाफना म्हणाले की हे विठुराया आमच्या कुटुंबीयांनी सुरू केलेली दिंडीची परंपरा सैदव सुरू ठेवण्याच आशिर्वाद आमच्या पुढच्या पिढीला मिळु आणि वारकरी सांप्रदायाची सेवा घडु दे अशी प्रार्थना त्यांनी केली आहे
विठ्ठल भजनी मंडळाच्या सहकार्याने हा दिंडी सोहळा गेली तीस वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे हा सेवेचा वारसा मला कुटुंबियांकडुन लाभला आहे “माझ्या वडलांची मिरासी गा देवा! तुझी चरण सेवा साधावा!!
या संत वचनाप्रमाणे वडीलांनी घालुन दिलेल्या परमार्थीक मार्गावर चालुन वारकर्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत राहील. – आकाश बाफना



