धर्म

पारंपरिक सणांतून संस्कृतीचा वारसा जिवंत ठेवूया – रोहिणीताई काशिद

वसुबारस निमित्त महिला शिवजन्मोत्सव समितीचा उपक्रम; गायींचे विधिवत पूजन, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

लोकतंत्र न्यूज नेटवर्क

भारतीय संस्कृतीत गोमातेचे पूजन हा श्रद्धेचा आणि मातृत्वाच्या सन्मानाचा सण मानला जातो. याच भावनेतून महिला शिवजन्मोत्सव समिती, जामखेड यांच्या वतीने वसुबारस निमित्त आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता पारंपरिक पद्धतीने गायींचे विधिवत पूजन करण्यात आले.

समितीच्या अध्यक्षा सौ. रोहिणीताई काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास गीता येवले, निर्मला सावंत, अल्का काशिद, रितु काशिद, पिंकू दाहितोंडे, शालन गुळवे, स्वाती क्षिरसागर, आरती क्षिरसागर, भारती फरांडे, आदिती उबाळे, आकांक्षा हावळे आदी माता भगिनींसह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 “वसुबारस हा मातृशक्तीचा आणि गोमातेच्या पूजनाचा सण आहे. आपल्या संस्कृतीत गाईला आईचे स्थान दिले गेले आहे. समाजात संस्कार, संस्कृती आणि एकता टिकवण्यासाठी अशा पारंपरिक सणांचे जतन करणे अत्यावश्यक आहे. आजच्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख आणि आदर शिकविण्याचे माध्यम हेच सण आहेत. म्हणून प्रत्येकाने हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.”

सौ. रोहिणी काशिद

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे संजय (काका) काशिद आणि त्यांच्या सौभाग्यवती रोहिणीताई काशिद यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत.

त्यामध्ये महिला व मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण (लाठी-काठी), दीपावली पाडव्यानिमित्त दीपोत्सव, गड-किल्ले मोहिम, दुर्गा शक्ती रॅली यांसारखे उपक्रम विशेष उल्लेखनीय ठरले आहेत.

सौ. काशिद यांनी महिलांना एकत्र येऊन समाजात चांगल्या उपक्रमांची नांदी घालण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी गोमाता पूजनानंतर सर्व महिलांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात भक्तीभाव, पारंपरिकता आणि उत्साह यांचे सुंदर मिश्रण दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!