लोकल न्यूज़
सामाजिक बांधिलकीची जाणीव! ‘चेअरमन’ उद्धव हुलगुंडे यांचा जि. प. शाळेला मदतीचा हात

लोकतंत्र न्यूज नेटवर्क-
जामखेडचे राजकारण ढवळून काढणारे व भाजपाचा झेंडा सतत फडकवून भाजपाच्या सर्व बातम्या सोशल मीडियावरून प्रसिद्ध करून सर्वसामान्य पर्यंत पोहोचवणारे उद्धव चेअरमन हे राजकीय कारणासाठी सर्वत्र परिचित आहेत.
राजकारणात सक्रिय असलेले उद्धव चेअरमन हे समाजकारणातही सक्रिय असल्याचे आजच्या एका घटनेवरून अधोरेखित होत आहेत
चेअरमन उद्धव आश्रू हुलगुंडे यांनी आपल्या बालपणीच्या शाळेप्रती असलेली सामाजिक जबाबदारी जपली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चुंभळी येथे आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात त्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी सर्वात मोठी देणगी देऊन एक आदर्श घालून दिला.
राजकीय व्यस्ततेतही शाळेला विसरले नाहीत
भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया विभागाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असतानाही, उद्धव हुलगुंडे यांनी आपली गावाकडील शाळा विसरली नाही. त्यांनी वैयक्तिकरित्या ₹ ७,७७७/- इतकी भरीव रक्कम ‘माजी विद्यार्थी मदत निधी’साठी दिली. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून त्यांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद ठरला आहे.
जि. प. प्रा. शाळा चुंभळी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात इतर माजी विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. (देणगीदारांमध्ये श्री. गौतम हुलगुंडे, श्री. मोहन गडदे, श्री. गोकुळ हुलगुंडे, श्री. मधुकर हुलगुंडे, श्री. पोपट हुलगुंडे आणि श्री. अशोक कोळेकर यांचा समावेश आहे, ज्यांनी प्रत्येकी ₹ १,०००/- चा निधी दिला).
शैक्षणिक साहित्य आणि प्रिंटरसाठी ठराव
जमा झालेल्या या सर्व निधीचा वापर शाळेसाठी अत्यावश्यक असलेले प्रिंटर आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.



