नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, पाहा कुणाला मिळाले कोणते खाते?
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या सरकारच्या नवीन मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर
या नव्या सरकारचा शपथविधी 9 जून 2024 रोजी पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

या मंत्रिमंडळात जुन्या चेहऱ्यांबरोबरच अनेक नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण खाते आहे, अमित शाह यांना गृह मंत्रालय आणि सहकार खाते देण्यात आले आहे. निर्मला सीतारामन या पुन्हा एकदा अर्थ मंत्री झाल्या आहेत.
नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक खाते आहे. एस. जयशंकर हे पुन्हा परराष्ट्र मंत्री बनले आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे कृषी खाते आहे.
एकूण 71 जणांना नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 36 राज्यमंत्री असतील.
महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि मुरलीधर मोहोळ यांना मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालंय.
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कुणा-कुणाला स्थान मिळालंय, हे कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री आणि राज्यमंत्री अशा विभागनिहाय पाहूया.