Uncategorizedलोकल न्यूज़

रत्नदीप च्या विरोधातील आंदोलनात ‘मनसे’, राष्ट्रवादी सह ‘प्रहार जनशक्ती’ चा पाठिंबा

मनसे चा शुक्रवारी रास्ता रोको तर प्रहारची जामखेड बंदची हाक

जामखेड वृत्तसेवा –

रत्नदीप मेडिकल कॉलेज मधील ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे,महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE). या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखा मधील सर्व विद्यार्थ्यांचे तत्काळ स्थलांतर व्हावे यासाठी सोमवार दि 27 जून २०२४  पासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले सह विद्यार्थी तहसील कार्यालय जामखेड समोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

याबाबत शासकीय स्तरातून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच उपोषणकर्ते पांडुराजे भोसले यांचीही प्रकृती बिघडल्याने माणुसकीच्या भावनेतून मनसे राष्ट्रवादी तसेच प्रहार जनशक्ती पक्ष यांनीही यामध्ये उडी घेत प्रशासनाला निवेदने दिली आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जामखेड तालुक्याच्या वतीने तहसीलदार गणेश माळी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जामखेड येथील रत्नदीप कॉलेजच्या विरोधात हिंदुस्थान प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडू राजे भोसले व विद्यार्थी विद्यार्थिनी गेली सहा दिवसापासून आमरण उपोषणास बसले आहेत. याबाबत अद्याप पर्यंत विद्यापीठ किंवा शासनाने सदरील मागण्या विषयी प्रत्यक्ष संपर्क करून
उपोषणकर्त्यांबरोबर संवाद साधला साधून उपोषण स्थगित करण्यासंदर्भात कोणतेही पाऊल उचललेले नसल्याने व उपोषणकर्त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली असल्याने येत्या दोन दिवसात प्रशासनाने योग्य ती कारवाई करून उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या संदर्भात विद्यार्थ्यांचे कसलेही शैक्षणिक नुकसान न होता विद्यार्थ्यांच्या स्थलांतराणाविषयी तात्काळ योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा वार शुक्रवार  दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता खर्डा चौक या ठिकाणी रस्ता रोको करून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत यादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्यास पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील.

 प्रहार जनशक्ती पक्ष यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले कि,

गेली सहा दिवसांपासून रत्नदीप कॉलेजच्या विरोधातील मागण्या संदर्भात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जामखेड चे पांडूराजे भोसले व सर्व विद्यार्थी आमरण उपोषणास बसलेले आहेत: हे आपणास अवगत आहे परंतु अद्याप पर्यंत सदरील मागण्यांविषयी विद्यापीठ किंवा जामखेड पोलीस ठाणे प्रशासनाने उपोषण कर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून उपोषण स्थगित करण्यासंदर्भात कोणतेही पाऊल उचललेले नसल्याने व उपोषणकर्त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली असल्याने येत्या दोन दिवसात प्रशासनाने योग्य ती कारवाई करून उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या संदर्भात विद्यार्थ्यांचे कसलेही शैक्षणिक नुकसान न होता विद्यार्थ्यांच्या स्थलांतराणाविषयी तात्काळ योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा वार शुक्रावार दिनांक: ५ जुलै २०२४ रोजी जामखेड शहर बंद करणार आहोत कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्यास पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील. तरी प्रशासनाने या निवेदनाची तात्काळ दाखल घेऊन उपोषणकर्त्याच्या मागण्या मान्य करून उपोषण थांबवावे हि विनंती.

उपोषण करते पांडूराजे भोसले यांचे वजन तीन किलो कमी झाले आहे बीपी सुद्धा कमी झाला आहे, त्यांची तब्येत खालावली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे व त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

 

या घटनेचे विधान सभा तसेच विधान परिषदेतही उमटले पडसाद !

सदर बाब हि अतिशय गंभीर असल्याने आ. राम शिंदे यांनी विधानपरिषदेत तर आ. रोहित पवार यांनी विधानसभेत लक्षवेधीत हा मुद्दा उपस्थित केलेला असून दोन्ही आमदार या विषयी गंभीर असल्याचे या बाबीवरून लक्षात येत आहे. तसंच दोघेही आपापल्या परीने हा मुद्दा लावून धरत असल्याने हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी दोघेही पुढाकार घेताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!