लोकल न्यूज़
कर्जत जामखेड मतदारसंघातून २५ टन पापड निर्मितीचं उद्दिष्ट
गृहिनींसाठी पापड उद्योग प्रशिक्षण कार्यशाळा आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम
लोकतंत्र न्युज नेटवर्क – ( जामखेड)-आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या माध्यमातून कर्जत जामखेड मतदारसंघातील गृहिनी महिलांसाठी कर्जत आणि राशीनमध्ये पापड उद्योग व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली असून या उपक्रमाला महिला भगिनींचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आणि तब्बल ४०० पेक्षा जास्त महिला भगिनी यात सहभागी झाल्या.
आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या सहकार्याने मतदारसंघात महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम घेण्यात येतात. बचत गटाच्या महिला आणि गरजू महिला-भगिनी स्वावलंबी बनाव्यात, स्वतःच्या पायावर त्यांनी उभा राहावे, घरी राहून त्यांना उत्पन्नाचं साधन तयार व्हावे यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. आतापर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून मतदारसंघातील हजारो महिलांना रोजगार मिळाला असून त्यांनी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरु केला आहे.



