राजकीय

विधान परिषद सभापतीपदी आ. राम शिंदे यांना संधी ?

कर्जत-जामखेड मध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

लोकतंत्र न्यूज नेटवर्क – महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान सभापती निवडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सध्या नीलम गोरे या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत, तसेच सभापतीपद रिक्त आहे. आता या पदाच्या निवडणुकीचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर होणार आहे.

गुरुवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यक्ष निवडीबाबत चर्चा होऊन त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या पदासाठी भाजप आपल्या उमेदवारांवर ठाम आहे. प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि निरंजन डावखरे यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचे भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितले. विधान परिषद सभापती निवडीबाबत निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष बैठक होणार आहे. या बैठकीला विधान परिषद सदस्य आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित राहणार आहेत.

भाजपला हवे आहे अध्यक्षपद
काही दिवसांपूर्वी नागपुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत भाजपचा अध्यक्ष असावा, असे विधान केले होते. या विषयावर महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करावी लागेल आणि सर्वांशी चर्चा करून संयुक्त निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले होते.

विधान परिषद सभापती पदासाठी भाजपाकडून आ. राम शिंदे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. भाजप कडून राम शिंदे यांचे नाव सर्वात पुढे आहे. दोन वेळा विधानसभेवर निवडून आलेले आमदार राम शिंदे हे फडणवीस सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री होते. आ. राम शिंदे हे धनगर सामाज्याचे आभ्यासु नेतृत्व असल्याने तसेच ओबीसी चेहरा असल्याने त्यांनाच संधी मिळणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

आ. राम शिंदे यांचे नाव सभापतीपदासाठी सर्वात अग्रेसर असल्याने कर्जत – जामखेड भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आ. रोहित पवार यांचा सामना करण्यासाठी भाजपने वेळोवेळी राम शिंदे याना बळ दिले असून सभापती पदाची संधी नेतृत्वाने त्यांना दिली तर शिंदे यांची ताकद वाढणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!