Uncategorized
ऑरेंज बिझनेस आयकॉन पुरस्काराने ज्योती क्रांती मल्टीटेस्टचे संस्थापक अजिनाथ हजारे सन्मानित

लोकतंत्र न्यूज नेटवर्क- जामखेड तालुक्यातील जवळा येथील ज्योती क्रांती मल्टीटेस्टचे संस्थापक अजिनाथ हजारे यांना दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑरेंज बिझनेस आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ऑरेंज रेडिओ यांच्या माध्यमातून दिला जाणारा ऑरेंज बिझनेस आयकॉन पुरस्कार अजिनाथ हजारे यांना प्रदान करण्यात आला. बँकिंग, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ज्योती क्रांती मल्टीटेस्टचे संस्थापक अजिनाथ हजारे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
जामखेड तालुक्यातील जवळा या छोट्याश गावातून ५ सप्टेंबर २००० साली अजिनाथ हजारे, दशरथ हजारे, विष्णू हजारे आणि मारुती रोडे या चार शिक्षकांनी ज्योती क्रांती पतसंस्था जवळा या पहिल्या शाखेची स्थापना केली. आज संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास ज्योती क्रांती मल्टिटेट. को. ऑप. बँकेच्या ४८ शाखा उभ्या करुन संपूर्ण राज्यभरात ज्योती क्रांती पतसंस्थेचे जाळे उभारले. या समूहाच्या माध्यमातून हजारे यांनी जवळपास ५०० ते ६०० कुटुंबातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.