Uncategorized
जामखेड येथील जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे यांच्या पर्यावरण संवर्धन निबंधास पुरस्कार जाहीर
युवा नेते प्रशांत शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा

प्रतिनिधी जामखेड
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्री यांचे वतीने पर्यावरणावर आधारित घेण्यात आलेल्या खुल्या निबंध स्पर्धेत जामखेड येथील जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे यांच्या निबंधाने पटकाविले असल्याची माहिती क्लबचे प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड यांनी दिली आहे.
या स्पर्धेसाठी तीन विषय ठेवण्यात आले होते त्यात पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आपले विचार, झाडे बोलू लागली तर व राहाता शहरातील नागरिकांसाठी खास राहाता शहर पर्यावरणपूरक होण्यास आपण काय योगदान देणार? हे विषय ठेवण्यात आले होते. महाराष्ट्रातून एकंदर 65 निबंध स्पर्धेत दाखल झाले होते. यातून सहा निबंधाची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली.
प्रथम पुरस्कार क्लबचे व्हॉईस प्रेसिडेंट ला. सुनील धाडगे यांचेकडून ” एअर बॅग ” व प्रशस्तीपत्र, द्वितीय पुरस्कार ” ज्ञानेश्वर जेजुरकर यांचेकडून इलेक्ट्रिक केटल व प्रशस्तीपत्र,तर तृतीय पुरस्कार कु. वैष्णवी निर्मळ हिला क्लबचे संस्थापक ला. विनोद गाडेकर यांचेकडून क्रॉम्प्टन इस्त्री, उत्तेजनार्थ बक्षिसे प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड, ला. ऋषिकेश गव्हाळे व निलेश पर्वत यांचेकडून टी सेट देण्यात येणार आहेत. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र दिले जातील.
राहाता सह्याद्री लायन्स क्लबच्या द्वितीय पदग्रहण समारंभात लवकरच मा. डि. गव्हर्नर ला. गिरीश मालपाणी व इतर मान्यवर यांचे हस्ते विजेत्यांना बक्षिसे देवून सन्मानित करण्यात येईल. बक्षीसपात्र व सर्व स्पर्धकांचे लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे संस्थापक ला. विनोद गाडेकर , सेक्रेटरी ला. सागर रोकडे व्हॉईस प्रेसिडेंट डॉ. स्वाधीन गाडेकर व ला. सुनील धाडगे, ला. डॉ. दत्ता कानडे, ला. डॉ. मिलिंद नाईक, ला. डॉ. वैभव मालकर, ला. डॉ. निर्मला गाडेकर,ला. गायत्री म्हस्के ला. राजश्री फंड, ला. राजश्री रोकडे, ला. राजश्री डांगे, ला. ज्ञानेश्वर नळे , ला. मिलिंद कडलग , ला. सचिन लोढा, ला. ॲड. सुधीर बोठे, ला.नितीन दिवटे, ला. सिराज शेख, ला. शिवम सपिके, ला. सत्यम सदाफळ, ला. विजय बनकर, ला. प्रतिक वाघे, ला. कृष्णा बोठे , ला. सुनील काळोखे, ला. संदीप पुंड, ला. राजेंद्र म्हस्के, यांनी अभिनंदन केले आहे.
या निमीत्ताने जवळा गावचे युवा नेते प्रशांत शिंदे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
या निमीत्ताने जवळा गावचे युवा नेते प्रशांत शिंदे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
