Uncategorizedलोकल न्यूज़
मराठी पत्रकार संघाच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी ओंकार दळवी ,उपाध्यक्षपदी समीर शेख

लोकतंत्र न्यूज नेटवर्क –
(प्रतीनीधी विजय राजकर ) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जामखेड तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून जिल्हाउपाध्यक्षपदी लियाकत शेख,जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी प्रकाश खंडागळे,दीपक देवमाने तर जामखेड तालुकाध्यक्षपदी दैनिक प्रभातचे ओंकार दळवी ,उपाध्यक्षपदी समीर शेख,सचिव पदी संदेश हजारे कार्याध्यक्षपदी सचिन आटकरे तर खजिनदारपदी रामहरी रोडे याच्या नियुक्ती करण्यात आल्या असून निवडीचे पत्र संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी ,जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाचपुते यांच्या हस्ते देण्यात आले

पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे राज्य सचिव सीताराम लांडगे यांच्या सुचनेनुसार काष्टी ता श्रीगोंदा येथील सेवा सोसायटीच्या सभागृहात प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती,
जिल्हाउपाध्यक्षपदी लियाकत शेख,
जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी प्रकाश खंडागळे,दीपक देवमाने
जामखेड तालुकाध्यक्षपदी दैनिक प्रभातचे ओंकार दळवी ,
उपाध्यक्षपदी समीर शेख,
सचिव पदी संदेश हजारे
कार्याध्यक्षपदी सचिन आटकरे
तर खजिनदारपदी रामहरी रोडे
यांना निवडीचे पत्र देण्यात आले.


