लोकल न्यूज़

तहसीलदारांच्या लेखी आश्वासनंतर अँड. नागरगोजे यांचे उपोषण मागे

लोकतंत्र न्यूज नेटवर्क-

ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेचे अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ यांच्या सर्व मालमत्ता जप्त करून तात्काळ ठेवीदारांच्या ठेवी परत द्याव्यात. भ्रष्ट आमदार, खासदार, मोठे अधिकारी यांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करावी. शेतकऱ्यांना कृषी पंप द्यावेत यासह विविध मागण्यांसाठी अॅड. महारुद्र नागरगोजे यांनी जामखेड तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.’नाही जातीसाठी… लढा मातीसाठी… गरिबांच्या हक्कासाठी’, असे घोषवाक्य घेऊन अॅड. महारुद्र नागरगोजे यांनी जामखेड तहसील कार्यालयासमोर सोमवारी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते. त्यांनी प्रभारी तहसीलदार मनोज भोसेकर यांना निवेदन दिले होते.
जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्ते ॲड.महारूद्र नागरगोजे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
या आंदोलनाची‌ घेत दखल आज रोजी अॅड. महारुद्र नागरगोजे यांनी गोर-गरीब जनतेसाठी सुरु केलेले आंदोलनाला यश आले असून जामखेड चे तहसीलदार गणेश माळी यांच्या लेखी आश्वासनंतर तहसीलदार गणेश माळी,जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व उपस्थित ठेविदार ,गोरे – गरीब नागरिकांच्या हस्ते पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.
ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे व संचालक मंडळ व शाखाधिकारी यांच्यावर बॅकिंग कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती हभप ॲड.महारुद्र नागरगोजे यांनी दिली.
यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात,जेष्ठ नेते सुरेश भोसले,शहाजी राळेभात,वैजिनाथ पोले, संजय काशिद, महेश निमोणकर,माजी सरपंच गफ्फारभाई पठाण, समीरभाई पठाण, बापूसाहेब कार्ले,ॲड. हर्षल डोके, संदीप राळेभात,अनिल बाबर,संतोष गव्हाळे, अभिजीत राळेभात,लक्ष्मी पवार,संतोष पिंपळे, सदाशिव ढवण, लक्ष्मण बांगर, दिगंबर राळेभात, ॲड.महेश वारे, ॲड.अजिनाथ जायभाय, युवराज शेलार, कांतीलाल आढाव तसेच वकील संघटना आदींनी पाठिंबा दर्शविला होता.
या उपोषण प्रसंगी प्रवीण राळेभात, शिवलिंग राउत,अरुण चव्हाण,उत्तम सावंत,मोहन चव्हाण ,दया चव्हाण,नारायण सावंत, डॉ. प्रदीप कात्रजकर, सुतार सर, ॲड.प्रमोद राऊत, मधुकर पवार,दादाहरी शिंदे,महेश भोसले, दहीकर सर ,अशा बऱ्याच ठेविदारांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
उपोषणामध्ये गोरगरिबांचे मुद्दे असल्यामुळे खेडेगावातून सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांनी येऊन पाठिंबा दिला आहे.

अशा होत्या मागण्या-खडकाळ १५ एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना अल्पभूधारक घोषित करा, गरिबांना राहण्यासाठी घरे, जागा द्या, भूमिहीन लोकांना सरकारी जमीन देताना वर्ग १ करून मिळावी, गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे, ज्यादा पगार असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पगार कमी करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार वाढवून द्यावा, तसेच ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेच्या पदाधिकारी व संचालकांच्या मालमत्ता जप्त करून ठेवीदारांना ठेवी मिळाव्यात,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!