राजकीय
राशीन येथे नवरात्रीत ऐतिहासिक सोहळा, श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे भूमिपूजन

लोकतंत्र न्यूज नेटवर्क –
राशीन येथे नवरात्रीत ऐतिहासिक सोहळा, क्रिकेटर रोहित शर्मा यांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे भूमिपूजन
कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने नवरात्रीच्या पावन पर्वावर राशीन येथे एक ऐतिहासिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे, ज्यामुळे क्रीडा आणि मनोरंजनाचा जल्लोष होणार आहे. श्री जगदंबा देवी मातेच्या पवित्र भूमीत, श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमी आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम राशीन येथे गुरुवारी ( दि. ३ ऑक्टोबर २०२४) ला सकाळी ११ वाजता होणार आहे
(Advt)

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार आणि वर्ल्ड कप विजेता रोहित शर्मा, जो या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. क्रिकेटप्रेमींसाठी हा सोहळा खास आकर्षण ठरणार आहे.
याचबरोबर मनोरंजनाचा तडका म्हणून प्रसिद्ध DJ Kretecs, सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत, आणि श्रावणी महाजन यांचा मधुर आवाज सोहळ्याला रंगत आणणार आहे.



