लोकल न्यूज़

नितीन (तात्या) पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

जामखेड, साकत परिसरात शोककळा

लोकतंत्र न्यूज नेटवर्क –

जामखेड तालुक्यातील साकत येथील नितीन (तात्या) मुरूमकर पाटील वय (58 ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने जामखेड येथील राहत्या घरी निधन झाले यामुळे जामखेड, साकत परिसरात शोककळा पसरली आहे. दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणून ते ओळखले जात होते. अचानक छातीत दुखू लागल्याने खाजगी दवाखान्यात दाखल केले पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.

नितीन मुरूमकर पाटील हे तात्या पाटील नावाने परिचित होते. साकत मध्ये ते ग्रामपंचायत सदस्य होते. साकत मध्ये शिवसेनेची शाखा गावात स्थापन केली होती. सध्या ते जामखेड मध्ये स्थायीक झाले होते.

साकतचे सरपंच हनुमंत पाटील यांचे ते चुलते होत. सुमारे वीस वर्षापासून ते जामखेड परिसरात प्लाँटिंगचा व्यवसाय करत होते. तात्या पाटील हे दिलखुलास व्यक्तीमत्व होते. सतत हसतमुख असायचे. त्यांच्या अचानक जाण्याने जामखेड व साकत परिसरात शोककळा पसरली आहे.

तात्या पाटील यांचा मोठा मित्रपरिवार जामखेड परिसरात आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले(विवाहित) एक मुलगी (विवाहित) सुना नातवंडे असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!