राजकीय
आमदार प्रा राम शिंदे यांचे ठरले ! शुक्रवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज

लोकतंत्र न्यूज नेटवर्क –
कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रा राम शिंदे हे शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी कुठलेही शक्तिप्रदर्शन न करता, अत्यंत साधेपणाने हा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातून आमदार प्रा राम शिंदे यांना भारतीय जनता पार्टीने सलग चौथ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे.यंदा होणाऱ्या निवडणूकीसाठी आमदार प्रा राम शिंदे हे उद्या २६ रोजी दुपारी १२ नंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याबाबत आमदार प्रा राम शिंदे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहीत माहिती दिली आहे.




