राजकीय
आमदार प्रा राम शिंदे यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्याने केली २५ हजाराची आर्थिक मदत

लोकतंत्र न्यूज नेटवर्क –
जामखेड : कर्जत जामखेड मतदारसंघाच्या स्वाभिमान आणि अभिमानासाठी सुरु असलेला भूमिपुत्रांचा लढा आता निर्णायक वळणावर पोहचला आहे. रोहित पवाररूपी धनदांडग्या असणाऱ्या प्रस्थापित अश्या बलाढ्य शक्तीविरोधात निवडणूक लढण्यासाठी स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी स्वखुशीने आमदार प्रा राम शिंदे यांना आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली आहे.
जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील गणेश जायभाय व रेश्मा जायभाय या दाम्पत्याने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आमदार प्रा राम शिंदे यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी २५ हजाराची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश जायभाय व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज २ नोव्हेंबर रोजी आमदार प्रा राम शिंदे यांची चोंडी येथील निवासस्थानी भेट घेत २५ हजाराच्या आर्थिक मदतीचा धनादेश आमदार शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.



