लोकल न्यूज़
स्वयंरोजगारासह सक्षमीकरणाची वाट धरा-तहसीलदार गणेश माळी
एकल महिलांच्या मुलांना शिक्षणाला बळकटी-एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप* *साऊ एकल महिला समिती व स्नेहालय'चा उपक्रम.

लोकतंत्र न्यूज नेटवर्क –
साऊ एकल महिला समिती आणि स्नेहालय यांच्या संयुक्त विद्यमाने संवेदन शैक्षणिक पालकत्व अभियानाअंतर्गत एकल महिलांच्या मुलांना दि.१६ रोजी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम पंचायत समिती सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी विचार मंचावर तहसीलदार गणेश माळी,गट विकास अधिकारी शुभम जाधव,महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी मीरा सानप,जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पुराणे,प्रहारचे तालुका अध्यक्ष नय्युम सुभेदार,जलसंधारण विभागाचे जे.डी. बागुल,मीना कुलकर्णी,सुवर्णा हजारे आदी उपस्थिती होते

यावेळी तहसीलदार माळी म्हणाले की;स्नेहालय आणि एकल महिला पुनर्वसन समितीच्या माध्यमातून महिलांनी स्वयंरोजगारासह सक्षमीकरणाची वाट धरत आपला हक्क अधिकारासाठी जागृत राहून शासकीय योजनांचा लाभ घेऊन मुलांच्या उच्च शिक्षकणासाठी सजग राहिले पाहिजे.एकल महिलांच्या संघर्षासोबत साऊ समिती,स्नेहालय,सर्व शासकीय यंत्रणा पूर्ण पाठींब्यानिशी उभे राहील.पुढे बोलतांना त्यांनी साऊ एकल महिला समिती,स्नेहालय कामाचे कौतुक केले. एकल महिलांचे मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत स्वयंरोजगार सक्षमीकरणाची वाट वाट धरा असे ते म्हणाले.
आर्थिक सामाजिक परिस्थितीमुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये
शुभम जाधव,गट विकास अधिकारी जामखेड
शिक्षण हे प्रत्येक मुलाचा आणि मुलीचा मूलभूत हक्क आहे.आर्थिक किंवा सामाजिक परिस्थितीमुळे काही मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते.विशेषतः ज्या एकल माता आपल्या मुलांचे भविष्य घडवण्यासाठी एकट्याने संघर्ष करत आहेत त्यांच्यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरतात.बालविवाह कुप्रथांच्या विरोधात एकजुटीने लढायला हवं. आर्थिक सामाजिक परिस्थितीमुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये असे ते म्हणाले.यावेळी डॉ.सुनील पुराणे, बालविकास अधिकारी मीरा सानप, प्रहारचे नय्युम सुभेदार,डॉ.एहसान शेख आदींची भाषणे झाली.
संवेदन शैक्षणिक पालकत्व अभियानातंर्गत जामखेड तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील ५० एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते नासिर सय्यद,अनिता ढोले,मीना कुलकर्णी,मझहर खान,अनिल घोगरदरे, देवा देवकर,जयराम झेंडे,प्रतिभा धेंडे,आशा स्वयंसेविका आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.तुकाराम घोगरदरे यांनी केले.सूत्रसंचालन योगेश अब्दुले तर आभार नासिर सय्यद यांनी मानले.
साऊ एकल महिला पुनर्वसन समिती व स्नेहालय माध्यमातून संवेदन शैक्षणिक पालकत्व अभियानातर्गत एकल महिलांच्या मुलांना केवळ वह्या,पुस्तके आणि इतर सर्व शैक्षणिक साहित्य देत नाही तर त्यांच्या मनांत ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करत शिक्षणाच्या प्रवासाला बळ देत आहोत.
-योगेश अब्दुले
समन्वयक साऊ एकल महिला समिती जामखेड.




