लोकल न्यूज़

विविध प्रश्नाबाबत नगरपरिषदेत नागरिकांचे ठिय्या आंदोलन

आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग

लोकतंत्र न्यूज नेटवर्क
: जामखेड नगरपरिषद हद्दीतील जिल्हा परिषद तपनेश्वर शाळा, मिलिंद नगर, कान्होपात्रा नगर परिसरातील प्रमुख रस्त्याची झालेली दुरावस्था तातडीने दुरुस्त करणे , कचरा रोजच्या रोज उचलणे, नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करणे , मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, तपनेश्वर शाळेचा मुख्य रस्ता करणे, अशा अनेक मुलभुत सोयी-सुविधांच्या प्रश्‍नांकडे नगरपरिषद प्रशासनाद्वारे होणार्‍या अक्षम्य दुर्लक्षपणाच्या निषेधार्थ जामखेड चे माजी सरपंच संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दि.11 ऑगस्ट रोजी धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चा खर्डा चौकातील नगरपरिषद कार्यालयावर नेण्यात आला यावेळी नागरीक व महिला, लहान मुले सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकर्‍यांनी पालिकेवरील प्रशासक अधिकारी यांच्यावर  अनागोदी कारभारावर करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच नगरपरिषद विविध प्रश्नाचे निवेदन देण्यात आले.

या भागातील रस्ता वर पडलेले खड्डे त्यामध्ये साचलेले पाणी गटारी नसल्यामुळे रस्त्यावर नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येत आहे. या अस्वच्छता , दुर्गंधीमुळे नागरिकांच्या व लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच या भागात जागो जागी मोठ मोठे कचर्‍याचे ढिगारे साचलेले आहेत, मोकाट जनावरे , शाळेजवळील असलेली विहीर बुजवणे, पाण्याचा निचरा करणे,रस्त्यावर मुरूम टाकावे अशी मागणी यावेळी करण्यात . यासह अन्य मागण्या मोर्चेकर्‍यांनी केल्या.

यावेळी नगरपरिषद मध्ये ठिय्या आंदोलन केले. याची  नगरपरिषदने तातडीने दखल घेऊन नगरपरिषदेचे कर्मचारी या भागात पाठवून याची पाहणी करून प्रश्न सोडवण्यासाठी काम सुरू केले.

या मोर्चात सागर भोसले,अजय भोसले, संतोष नवलाखा,पिंटू डुचे, हरिश्चंद्र पवार, विठ्ठल क्षिरसागर, आनंद कुलकर्णी, गोकुळ शेळके, राहुल भोसले, सिताराम लोखंडे, गोविंद जिरेकर, निता भोसले, अंतिमा डुचे, गणेश सुतार,मनोज कार्ले, दादा महाडिक, राहुल भागवत, राजेंद्र लुंकड,पवन रोडे,सलीम शेख, फिरोज पठाण, शुभम बनकर, राजेंद्र राऊत, बबन मुसळे, अवि भोसले, विजय भोसले, अर्चना सिद्धेश्वर, मंगल जाधव, सुनिता फाळके, सिंधुबाई काटकर, पल्लवी सुतार, कालिंदा जाधव, शितल सुतार, स्वाती भोसले, अनिता भोसले, सविता डुचे, मनीषा मुळे, राजश्री कडेकर, रंजना भोसले, सुनिता भोसले,लता भोसले आदींसह मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!