लोकल न्यूज़

प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न 

नगरसेविका राजश्री ताई पवार व युवा नेते मोहन (वस्ताद) पवार यांचा पुढाकार

लोकतंत्र न्यूज नेटवर्क – जेष्ठ भाजपा नेते प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका राजश्री पवार व मोहन पवार यांनी  मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित केले होते यामध्ये रूग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

 भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे निमित्ताने काल दि. ११ ऑगस्ट पासून कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने आज बुधवार दि. १३ ऑगस्ट रोजी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ९ च्या नगरसेविका राजश्रीताई पवार व युवा नेते मोहन (वस्ताद) पवार यांच्या पुढाकारातून जामखेड शहरातील तपनेश्वर भागात मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

राजश्रीताई पवार व मोहन पवार या दांपत्याने गेल्या पाच वर्षांत प्रभाग नऊ मधे विकासकामांसह हळदी-कुंकू समारंभ, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम राबवून सामाजिकबांधिलकी जपली आहे.

या शिबिराचे उद्घाटन जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या हस्ते तर प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास मासाळ, वकिल संघटनेचे अध्यक्ष प्रमोद राऊत, डॉ. संजय भोरे, दिगांबर चव्हाण, पवन राळेभात, अमित जाधव, डॉ. अशोक बांगर, संजय परदेशी. ताहेर खान, सुरज पवार, सुंदरकाका देशमुख, आनंद ढवळे, राजेंद्र लोहार, रमेश जाधव, अनिकेत जाधव, योगेश औचरे, उमेश माळवदकर, गणेश काळे आदि मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात डॉ. भरत दारकुंडे, डॉ. अजय क्षिरसागर, डॉ. अमित पाळवदे आणि डॉ. पौर्णिमा अमित पाळवदे हे तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित आरोग्यसेवा दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!