धर्म

विजयादशमी उत्सवानिमित्त जामखेड येथे पथसंचलन व शस्त्रपूजन उत्साहात पार

“सेवा, सुरक्षा व संघटन” याचे एकत्रित दर्शन संघाच्या शताब्दी वर्षाच्या दिशेने वाटचाल

लोकतंत्र न्यूज नेटवर्क- 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करत असताना राष्ट्रकार्याची अविरत ज्योत तेवत ठेवत आहे. असंख्य स्वयंसेवकांनी राष्ट्रकार्याकरिता आपले जीवन समर्पित केले असून याच कार्याचे दर्शन विजयादशमीच्या उत्सवात पाहायला मिळाले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जामखेड येथे पथसंचलन व शस्त्रपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या संचलनात सुमारे २७० स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात सहभाग घेतला होता. बाजार समितीपासून महावीर भवनपर्यंत काढण्यात आलेल्या पथसंचलनाचे नागरिकांनी पुष्पवर्षाव व रंगोळीच्या स्वागताने मनापासून स्वागत केले.

महावीर भवन येथे शस्त्रपूजनानंतर कार्यक्रमास प्रारंभ झाला.

या वेळी तालुका कार्यवाह मा. बाळासाहेब दळवी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सीमाताई कुंदन गायकवाड (स्वच्छता दूत) व कॅप्टन लक्ष्मण भोरे उपस्थित होते.

सीमाताई गेल्या वीस वर्षांपासून नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असून समाजसेवेचा आदर्श ठरल्या आहेत. तर कॅप्टन भोरे यांनी देशसेवेसाठी आपले जीवन अर्पण केले आहे.

प्रमुख वक्ते मा. यशोवर्धन (आण्णा) वाळिंबे यांनी संघाचे शताब्दी वर्ष म्हणजे “सेवा, सुरक्षा आणि संघटन” या त्रिवेणी संगमाचे प्रतिक असल्याचे सांगितले.

, “स्वदेशी, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन व पर्यावरण या पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून स्वयंसेवक घराघरात प्रबोधन करणार आहेत. स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढविणे हे राष्ट्रनिर्मितीचे बळ आहे.”

वाळिंबे पुढे म्हणाले की,

“आज परकीय शक्ती देशात जात, प्रांत, भाषा यांच्या माध्यमातून फुट पाडण्याचे डाव खेळत आहेत. या अदृश्य शक्तींना वेळेत ओळखून त्यांचा डाव हाणून पाडला पाहिजे. देश एकत्रित राहावा म्हणूनच डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. त्या छोट्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे आणि ‘राष्ट्रप्रथम’ ही भावना जपत संघ अखंड कार्यरत आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!