धर्म
पारंपरिक सणांतून संस्कृतीचा वारसा जिवंत ठेवूया – रोहिणीताई काशिद
वसुबारस निमित्त महिला शिवजन्मोत्सव समितीचा उपक्रम; गायींचे विधिवत पूजन, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

लोकतंत्र न्यूज नेटवर्क–
भारतीय संस्कृतीत गोमातेचे पूजन हा श्रद्धेचा आणि मातृत्वाच्या सन्मानाचा सण मानला जातो. याच भावनेतून महिला शिवजन्मोत्सव समिती, जामखेड यांच्या वतीने वसुबारस निमित्त आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता पारंपरिक पद्धतीने गायींचे विधिवत पूजन करण्यात आले.
समितीच्या अध्यक्षा सौ. रोहिणीताई काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास गीता येवले, निर्मला सावंत, अल्का काशिद, रितु काशिद, पिंकू दाहितोंडे, शालन गुळवे, स्वाती क्षिरसागर, आरती क्षिरसागर, भारती फरांडे, आदिती उबाळे, आकांक्षा हावळे आदी माता भगिनींसह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
“वसुबारस हा मातृशक्तीचा आणि गोमातेच्या पूजनाचा सण आहे. आपल्या संस्कृतीत गाईला आईचे स्थान दिले गेले आहे. समाजात संस्कार, संस्कृती आणि एकता टिकवण्यासाठी अशा पारंपरिक सणांचे जतन करणे अत्यावश्यक आहे. आजच्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख आणि आदर शिकविण्याचे माध्यम हेच सण आहेत. म्हणून प्रत्येकाने हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.”
सौ. रोहिणी काशिद