लोकतंत्र न्यूज नेटवर्क-
आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी जामखेड नगरपरिषदेतील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना व त्यांच्या सौभाग्यवती पायलताई बाफना यांच्या वतीने दीपावली निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवकुमार डोंगरे तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमाद्वारे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण सेवाभावाचा गौरव करण्यात आला. यावेळी आकाश बाफना यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान अनमोल आहे. दिवाळीच्या या सणात त्यांच्या मेहनतीचे कौतुक करणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे.