धर्मलोकल न्यूज़

जामखेडमध्ये ७ मार्च रोजी ऐतिहासिक ‘विराट हिंदू संमेलन’

ह.भ.प. महंत श्री रामगिरीजी महाराजांची मुख्य उपस्थिती

जामखेड | प्रतिनिधी: अहिल्यानगर जिल्ह्याच्या पावन भूमीत, जामखेड शहरात राष्ट्राभिमान आणि हिंदू ऐक्याचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शनिवार, ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता ऐतिहासिक ‘विराट हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले असून, या सोहळ्यामुळे संपूर्ण जामखेड परिसर भगवामय होण्यासाठी सज्ज झाला आहे.

या महासंमेलनास ह.भ.प. महंत श्री रामगिरीजी महाराज (श्री गोदावरी धाम, सरला बेट) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहकार्यवाह मा. श्री. महेशजी करपे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच परिसरातील विविध संत-महंतांच्या पावन उपस्थितीने हा सोहळा संपन्न होईल

संमेलनाची वैशिष्ट्ये आणि मुख्य उद्देश:

  • सामाजिक समरसता: जात, भाषा, प्रदेश किंवा आर्थिक भेदभाव विसरून सर्वांना ‘आपले’ मानण्याचा संदेश या व्यासपीठावरून दिला जाईल.
  • ‘कुटुंब ते राष्ट्र’ संकल्पना: कुटुंब हाच समाज आणि राष्ट्राचा पाया आहे, हा विचार रुजवत समाजाला एका विचाराने जोडणे.
  • सामाजिक मूल्ये: पर्यावरण संरक्षण, पाणीबचत, वृक्षारोपण, नागरिक शिस्त, मातृभाषेचा आग्रह आणि स्वदेशी विचारांवर समाजाला दिशा देणे.
  • एकात्मतेचा हुंकार: ‘एक मंदिर, एक पाणवठा आणि एक स्मशानभूमी’ या विचारातून सामाजिक ऐक्याची भूमिका ठामपणे मांडली जाणार आहे.
हा सोहळा जामखेडच्या सांस्कृतिक इतिहासातील सुवर्णक्षण आहे. नागरिकांनी आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशाला परम वैभवाकडे नेण्याच्या या संकल्पात सहभागी व्हावे.”सौ. रोहिणीताई काशिद (अध्यक्षा, आयोजन समिती)

या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समिती अध्यक्षा सौ. रोहिणीताई काशिद, उपाध्यक्ष श्री. मोहन ढाळे, श्री. संतोष फिरोदिया, श्री. संतोष टेकाळे आणि श्री. संजय टेकाळे यांच्यासह सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!