लोकल न्यूज़

रत्नदीप च्या विरोधात पांडुराजे भोसले पुन्हा आक्रमक

असंख्य विद्यार्थी समवेत उपोषणाला सुरुवात

जामखेड वृत्तसेवा –

रत्नदीप मेडिकल कॉलेज मधील ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे,महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE). या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखा मधील सर्व विद्यार्थ्यांचे तत्काळ स्थलांतर झाले नाही तर सोमवार दि 27जून २०२४ रोजी सकाळी १० वाजले पासून तहसील कार्यालय जामखेड समोर सर्व विद्यार्थी ,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले सह विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत.

निवेदनात म्हंटले की , रत्नदीप मेडिकल फौंडेशन अध्यक्ष भास्कर मोरे याने वरील विषयानुसार उल्लेखित विद्यापीठाच्या माध्यमातून विविध शाखा सुरू करून विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांचे आर्थिक , मानसीक , शारिरीक शोषण करून खूप मोठे नुकसान केले आहे. त्या संदर्भात रत्नदीप मेडिकल कॉलेजचे दोन्ही शाखेतील सर्व विद्यार्थी , ग्रामस्थ , सर्व संघटना यांनी मार्च २०२४ मध्ये दीर्घ काळ आंदोलन व पांडुरंग भोसले यांनी आमरण उपोषण केल्या नंतर याची दखल घेऊन विद्यापीठ , मुख्यमंत्री , जिल्हाधिकारी अहमदनगर , आमदार रोहीत पवार , आमदार राम शिंदे , खा.निलेश लंके यांनी दखल घेऊन या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले व या विश्वासावर हे आंदोलनं स्थगित करतांना उपोषण कर्ते पांडूरंग भोसले यांनी जलपांन घेऊन उपोषण थांबवले होते.

या घटनेला आज तीन महीने होऊन देखील सर्व विद्यार्थ्यांना इतर कॉलेज मध्ये स्थलांतरित करुन दोन्ही शाखा मधील विद्यार्थ्यांचा रत्नदीप मेडिकल कॉलेजने वसूल केलेल्या फिस चा प्रश्न सोडवला गेलेला नाही. ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पुर्ण झाले त्यांचे शाळा सोडल्याचे दाखले देण्यास रत्नदीप मेडिकल कॉलेज टाळाटाळ करत आहे तसेच , बी फॉर्म विद्यार्थ्यांनी व्यावसायिक परवाना काढण्यासाठी कॉलेज कडून आवश्यक ती कागदपत्रे व आवश्यक त्या ठिकाणी सह्या शिक्के देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.

वरील प्रश्न गंभीर असून या मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होण्याचा भीती निर्माण झाली आहे. तरी वरील सर्व विषयांची विद्यापीठ व प्रशासनाने दखल घ्यावी न्याय मिळावा म्हणून दि 27जून २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजले पासून सर्व विद्यार्थी , सामाजिक जबाबदारी समजून श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तसेच विद्यार्थ्यांच्या वतीने श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जामखेड तालुका अध्यक्ष पांडुरंग मधुकर भोसले हे आमरण उपोषणाला बसले आहेत.

गेल्या 3 महिन्यापासुन चालु असलेल्या प्रक्रिया मधे विद्यार्थ्याच्या कॉलेज स्थलांतर संबध्दित कुठेही पाहिजे तसा प्रतिसाद पुढिल युनिव्हर्सिटी कडुन भेटला गेला नाही,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे,महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE). जर या घटनेतुन विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाल्यास वरिल युनिव्हर्सिटी जबाबदार राहतिल.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुढील शैक्षणिक वर्ष 10-15 दिवसात सुरू होत आहेत त्यामुळे त्याबद्दल दक्षता घेण्याची मागणी यावेळी पांडुरंग भोसले यांनी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!