लोकल न्यूज़

जामखेडमध्ये गणेश मेंढकर व आनंद राजगुरू यांचानगरसेवक मोहन पवार यांच्या हस्ते सत्कार

लोकतंत्र न्यूज नेटवर्क-

 महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघाचे तालुकाध्यक्षपदी गणेश संजीवन मेंढकर तसेच विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी आनंद चंद्रकांत राजगुरूयांची नुकतीच निवड झाली.

या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक मोहन (वस्ताद) पवार व मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणारे नगरसेवक मोहन पवार हे विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या मान्यवरांचा सत्कार करून त्यांचा गौरव करीत असतात.

त्याच परंपरेत दि. ९ सप्टेंबर रोजी जामखेड येथे गणेश मेंढकर व आनंद राजगुरूयांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

या वेळी नगरसेवक मोहन पवार, नगरसेवक राजेश वाहवळ, उद्योजक उमेश माळवदकर, विनायक राऊत, लहूशेठ पवार, राजू सासवडकर, विमा प्रतिनिधी बाळासाहेब पेचे, सतीश पालकर, अशोक घुमरे, सनी गायकवाड, अभिमान खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!