लोकल न्यूज़
जामखेडमध्ये गणेश मेंढकर व आनंद राजगुरू यांचानगरसेवक मोहन पवार यांच्या हस्ते सत्कार

लोकतंत्र न्यूज नेटवर्क-
महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघाचे तालुकाध्यक्षपदी गणेश संजीवन मेंढकर तसेच विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी आनंद चंद्रकांत राजगुरूयांची नुकतीच निवड झाली.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक मोहन (वस्ताद) पवार व मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणारे नगरसेवक मोहन पवार हे विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या मान्यवरांचा सत्कार करून त्यांचा गौरव करीत असतात.




